अमळनेरला गलवाडे रस्त्यावरील चौकाचे ‘सरदार वल्लभभाई पटेल चौक’ नामकरण व फलकाचे अनावरण

अमळनेर : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व एकता दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावर सरदार वल्लभभाई पटेल चौकाचे नामकरण करून फलकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. नॅनो तज्ञ प्रा डॉक्टर एल ए पाटील, नगरसेवक श्याम पाटील, नगरसेवक मनोज पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, गुर्जर भवनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्याहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

गुर्जर समाजाची ही अनेक दिवसांपासून ची मागणी होती. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नाने ही मागणी मान्य करत तसे मंजूरीचे पत्र गुर्जर समाजाचे पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांनी सुपूर्द केले. याप्रसंगी दोडे गुर्जर भवन समितीचे माजी अध्यक्ष डॉ.एल.डी.चौधरी, सचिव सी.एस.पाटील, प्रा.डॉ.धनंजय चौधरी, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मिडिया अध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, अनिल चौधरी, डी.एम.पाटील, समाधान पवार, लक्ष्मण गुर्जर, केदार पाटील, श्रीकृष्ण पाटील, मगन चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मगन भाऊसाहेब यांनी तर सुत्रसंचलन प्रा.धनंजय चौधरी यांनी केले. सी.एस.पाटील यांनी आभार मानले. यावेळी गुर्जर समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुर्जर समाजातर्फे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आ.साहेबराव पाटील यांचेसह सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!