अमळनेर तालुक्यात अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये संविधान दिवस साजरा


अमळनेेर : येथील साने गुरुजी फाऊंडेशन, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन नवी दिल्ली, खान्देश विकास प्रतिष्ठान व महिला बाल विकास विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यात २५ अंगणवाडी व १० प्राथमिक शाळांमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भारतीयांना मिळालेला अमुल्य ठेवा म्हणजे संविधान होय. या प्रसंगी साने गुरुजी फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व जळगाव येथील महिला व बालविकास अधिकारी विजय सिंग परदेशी यांनी संविधानाबाबत माहिती देत संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. यासोबतच श्री परदेशी यांनी महिला व बालविकास योजनांसंबंधी माहिती दिली. जगदीश पाटील यांनी संविधानाचे वाचन केले. याप्रसंगी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका सोनवणे मॅडम यांचेसह अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते पवन साळुंखे, जयेश माळी, शरद पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!