अमळनेर : शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेतर्फे महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त प्रा. लिलाधर पाटील यांना जळगावचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन जळगाव येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय पुरस्कार सोहळ्यात नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष हेमंतकुमार साळुंखे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रभाकर झोड, जळगावचे तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी उपस्थित होते.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात पंधरा वर्षांपासून वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रेमचंद आहिरराव यांनी याप्रसंगी सांगितले. प्रा.लिलाधर पाटील यांना मिळालेल्या गौरव पुरस्काराबद्दल धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, एन.मूक्टो. प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.किशोर पाटील, सर्व पदाधिकारी यांनी महाविद्यालयात सत्कार केला. धनदाई संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.के.डी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नागरी हित दक्षता समितीचे प्रा.अशोक पवार, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांचेसह समाजाच्या विविध स्तरातून मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.