डॉ.महेश घुगरी यांची मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य पदी बिनविरोध निवड

विद्यापीठ विकास मंच तर्फे सत्कार

धुळे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्था चालक गटातील सिनेट सदस्यांमधून मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य (व्यवस्थापन परिषद) पदाच्या दि.५ डिसेंबर ला झालेल्या निवडणुकीत डॉ.महेश घुगरी यांची बिनविरोध निवड झाली. पारोळा येथील माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी बिनशर्त माघार घेतल्याने डॉ.महेश घुगरी यांची निवड बिनविरोध झाली.

डॉ.घुगरी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष असून रेड क्रॉस संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, धुळे जिल्हा क्रिडा संघाचे जिल्हा अध्यक्ष, तसेच धुळे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठ विकास मंच तर्फे सत्कार करून शुभेच्छा देतांना मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य दिलीप दादा पाटील व सिनेट सदस्य नितीन ठाकूर तसेच डॉ.सतीश पाटील यांनी माघार घेतल्यामुळे त्यांचे विद्यापीठ विकास मंचतर्फे जाहीर आभार मानण्यात आले. तसेच सर्व सन्माननीय सिनेट सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. डॉ.घुगरींचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ विकास मंच तर्फे विभाग प्रमुख नितीन ठाकुर, मॅनेजमेंट कॉंसिल सदस्य दिलीप दादा पाटील, दिपक पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्राचार्य राजू फालक, प्रा.नितीन बारी, विवेक लोहार, सिनेट सदस्य प्रकाश पाठक, अमोल पाटील, अमोल मराठे, दिनेश नाईक, मनीष चौधरी, दिनेश खरात, शबीर भाई, अँड.किर्ती पाटील, राजु ननावरे, सुरेश पवार पाटील, राजेंद्र जाखडी, अमोल सोनवणे, नितीन झाल्टे, दहातोडे, प्रशांत सरोदे, नितीन ठाकुर व विभाग प्रमुख विद्यापीठ विकास मंचचे सदस्य उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!