‘माझं गाव.. माझं अमळनेर’ ग्रुप तर्फे पूज्य सानेगुरुजींना आदरांजली

अमळनेेर : प.पूज्य सानेगुरुजी यांच्या जयंती निमित्त येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ‘माझं गाव.. माझं अमळनेर’ ग्रुप तर्फे सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक येथे आज भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वृक्षारोपण ही करण्यात आले. पुढील काळात सानेगुरुजी स्मारकाच्या कार्यात ग्रुप सहभागी होईल असे उपस्थित ग्रुप सदस्यांतर्फे सांगण्यात आले. याप्रसंगी भाऊसाहेब देशमुख, रणजित शिंदे, उदय खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रुप च्या झालेल्या बैठकीत सामाजिक उपक्रम व ग्रुप मेळावा घेण्या सदंर्भात चर्चा झाली. उपस्थित सर्व सदस्यांनी त्या कार्यासाठी सहमती दर्शविली. त्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी सुनील भामरे, भाऊसाहेब देशमुख, रणजित शिंदे, गोपी कासार, चेतन राजपूत, किरण पाटील, उदय खैरनार, विक्रांत पाटील, योगराज सदांनशिव, जितु सुर्यवंशी, दिपक चौगुले, निलेश पाटील, मनोज शिंगाणे, रोनक सकंलेचा, सोमचंद संदानशिव, भरत सैंदाणे, अजय दुसाने, गोविंदा बाविस्कर, हर्षल विसपुते, सुनिल वाणी, दिनेश करनकाळ, उमेश चौधरी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!