
अमळनेर : सालाबादाप्रमाणे प. पू. मोठेबाबा यांच्या कृपा-आशिर्वादाने तालुक्यातील खवशी येथे आजपासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरुवात होत आहे. हरिनाम सप्ताहाचे हे ६९ वे वर्ष आहे. येथील विठ्ठल मंदिराचे प्रांगणात ता.१८ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ या काळात दररोज कार्यक्रम सुरु राहतील. दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ तेे ११ हरि किर्तन याप्रमाणे कार्यक्रम होतील. कार्यक्रमास पंचक्रोशीतील नांद्री, पातोंडा, अमळगाव, खेडी, जळोद, पिंपळी, गांधली, पिळोदा, रोटवद, सावखेडा, दापोरी आदी ठिकाणचे भाविक व भजनी मंडळाचेही सहकार्य लाभणार आहे.
दि.१८ रोजी ह.भ.प. योगेश महाराज- वाघाडी, दि.१९ रोजी ह.भ.प. मुरलीधर महाराज- कढरे, दि.२० रोजी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज- वाडीभोकर, दि.२१ रोजी ह.भ.प. उमेशजी महाराज- औरंगपूर, दि.२२ रोजी रविंद्र महाराज- तारखेडा, दि.२३ रोजी ह.भ.प. दिपक महाराज- रेल, दि.२४ रोजी ह.भ.प. रामचंद्र महाराज- मालपूर यांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल. दि.२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळात ह.भ.प. ईश्वरलाल महाराज- पाळधी यांचे काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होवून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. प्रगतीशील शेतकरी लोटन फकिरा सूर्यवंशी हे महाप्रसादाचे मानकरी असून समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी यांनी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान, शिवशक्ती देवस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
