खवशी येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र मार्फत गुरूचरित्र पारायण सप्ताह

अमळनेेर : तालुक्यातील खवशी येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र यांच्या मार्फत दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून गुरूचरित्र पारायण सप्ताहास सुरुवात झाली आहे. महिला, पुरूष मिळून एकूण ६१ सेवेकरी गुरूचरित्र पारायणास बसले आहेत.

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र व सेवेकरी याच्यां वतीने सुुुरु असलेल्या या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ या वेळेत सामुदायिक रित्या पारायण वाचन केले जाते. सकाळी ६ ते ६.३० भुपाळी आरती, सकाळी १०.३० ला व संध्याकाळी ६.३० वाजता नैवद्य आरती यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन असा दिनक्रम आहे. दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूचरित्र पारायणाचे हे १३ वे वर्ष असून विशेष म्हणजे गुरूचरित्र पारायण हे सकाळी ४ वाजेलाच वाचले जाते. पारायणास खवशी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!