भारतीय सैन्याबद्दल सेवानिवृत्त सैनिकाचे प्रेम व राष्ट्रभक्तीचा परिचय

भारतीय सैन्यातील वीर सैनिक व कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधी संकलनासाठी नवी शक्कल

अमळनेर : भारतीय सैन्यातील वीर सैनिक व कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधी दिना निमित्त निधी संकलनासाठी अमळनेेर येथील माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी नवी शक्कल लढविली. त्यांनी मुलगा योगेश च्या लग्नात भारतीय सैन्यासाठी ध्वजनिधी ची मदत जमा करणारे बॅनर लावून स्वतंत्र पेटी ठेवून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींना आहेरा ऐवजी निधी संकलित केला. भारतीय सैन्याबद्दल असलेले प्रेम व राष्ट्रभक्तीचा परिचय एक सेवानिवृत्त सैनिक म्हणून त्यांनी पुन्हा करून दिलेला आहे.

सेवानिवृत्त सैनिक कीर्ती कुमार चौक हे ब्रम्हे गल्ली, अमळनेर येथील रहिवासी आहेेत. त्यांचा मुलगा संगीत विशारद चि.योगेश आणि चोपडा येथील वसंत जोशी यांची कन्या चि.सौ.का. ऋतुजा यांचा विवाह धुळे येथे संपन्न झाला. याप्रसंगी वर व वधू पित्यांनी लग्नात कुठल्याही प्रकारचा आहेर न स्विकारता त्याऐवजी ७ डिसेंबर हा दिवस ध्वज निधी दिवस होता यानिमित्ताने वीर शहीद सैनिक, वीर माता पिता, वीर पत्नी, त्यांचे कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधीला मदत करण्याचे आवाहन केले. ध्वज निधी संकलनात आप्तेष्ट व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. सदरचा जमलेला निधी हा जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द करणार आहेत. या उपक्रमाचे नातेवाईक व वऱ्हाडींनी कौतुक करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सेवानिवृत्तीनंतरही देशप्रेम दाखवून दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!