मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका तथा हजारो अनाथांची माय बनलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७३ वर्षांच्या होत्या. महिन्यापूर्वी त्यांचेवर हर्निया ची शस्त्रक्रिया होवून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आयुष्यात खूप संघर्ष करत आई-वडील नसलेल्या मुलांसाठी सिंधू ताईं केवळ आईच झाली नाही तर त्यांच्यासाठी रस्त्यावर भीक मागितली. एक-दोन नव्हे तर तब्बल १४०० मुलांची आई बनून सिंधू ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या मदतीसाठी वाहून घेतले. यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या मदर तेरेसा म्हणतात. इतक्या मुलांचे संगोपन करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देवून त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली !