राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ओमायक्रॉनचा कहर; कडक निर्बंध लागू

राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ओमायक्रॉनचाही कहर सुरू झाल्याने पुन्हा काल मध्यरात्रीपासून कडक निर्बंध घालण्यात आले असून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहतील. शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. जारी करण्यात आलेली नियमावलीमध्ये शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी आहे. मुंबई लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात मध्यरात्रीपासून पुढीलप्रमाणे नियमांचे पालन करावे लागणार आहे.

  • रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू.
  • मैदाने, उद्‍याने, पर्यटन स्‍थळे बंद राहणार.
  • रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू असतील.
  • २ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळेल.
  • राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.
  • खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी असणार आहे.
  • खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील.
  • लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी.
  • हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल.
  • स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा राहील.
  • २४ तास सुरु राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतील.
  • दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन्ही डोस आवश्यक. दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार.
  • राज्यात प्रवेश करताना लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक.
Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!