जिल्हा परिषद, पिंगळवाडे शाळेच्या मयूरी पाटील चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

अमळनेेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची कु.मयुरी किरण पाटील या विद्यार्थीनीची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाली असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु अंतिम निकाल दिनांक ०७ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, शिक्षक प्रविण पाटील, रविंद्र पाटील, वंदना सोनवणे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षकांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले. तिच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, निवृत्त उपअभियंता डी.पी.पाटील, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, पोलीस पाटील गजेंद्र पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील यांनी अभिनंदन केले आहे. मयुरीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!