जयवंतराव पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ या संस्थेची सन २०२२ ते सन २०२६ या काळासाठी पंचवार्षिक निवडणूक ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या शिक्षण संकुलात नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
रविवार, दिनांक ९ जानेवारी रोजी ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड या संस्थेची गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. आज दिनांक १० जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. अध्यक्ष पदाच्या लढतीत जयवंतराव मन्साराम पाटील यांना ७५० पैकी ५०५ मते मिळाल्याने जयवंतराव पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. अन्य निवडून आलेल्या कार्यकारी मंडळ सदस्यांमध्ये मारवड स्थानिक मधून देविदास शामराव पाटील (४७५ मते) सुरेश मन्साराम पाटील (४५६ मते) मनोज हिम्मतराव साळुंखे (४४९ मते) साहेबराव नारायण पाटील (४४९ मते) युवराज काशिनाथ पाटील (४३२ मते) तर मारवड परिसर करिता महारू रामदास शिसोदे (४६४ मते) चंद्रकांत रामराव शिसोदे (४५६ मते) सुरेश भिमराव शिंदे (४५४ मते) देविदास बारकु पाटील (४४९ मते) लोटन शिवदास पाटील (४४३ मते) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैजनाथ धनावळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एल.जी.चौधरी यांनी काम पाहिले. प्राध्यापक देवदत्त पाटील व सचिन पाटील यांनी निवडणुक कामी सहकार्य केले. सर्व विजयी उमेदवारांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व शुभेच्छा !