मातीपासून किल्ला निर्मिती उपक्रमातून पिंगळवाडे येथे अनोखी शिवजयंती

अमळनेेर : तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, पिंगळवाडे येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेतील पदवीधर शिक्षक प्रविण पाटील यांनी सहशालेय उपक्रमांतर्गत इ.६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला निर्मितीची संकल्पना मांडली. त्यास सहकारी शिक्षक यांनी दुजोरा देत संकल्पना मुर्तरुपात साकारण्यासाठी जागेच्या निवडीपासून साहित्याची जुळवा जुळव व दैनंदिन कार्याची आखणी करुन शाळेतील विद्यार्थ्यांना मातीपासून किल्ला निर्मिती प्रकल्प देण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इ.६ वी च्या विद्यार्थ्यांना “प्रतापगड किल्ला” व इ.७ वी च्या विद्यार्थ्यांना “शिवनेरी किल्ला” निर्मितीसाठी दररोज एक तास याप्रमाणे वेळ देण्यात येऊन सलग पाच दिवस टप्प्या टप्प्याने दररोज प्रात्यक्षिक कृती पुर्ण करुन घेतली.

“प्रतापगड किल्ला” निर्मितीत हिमांशू पाटील, कृष्णा पाटील, अनुराग पाटील, दिग्विजय पाटील, निखील पाटील, रोहन भिल, प्रशांत भिल, रोहन भिल, सोहन भिल, पवन पाटील, हिमेश कोळी, शाहिद फकीर, मयुरी पाटील, श्रुती पाटील, भाग्यश्री गायकवाड, प्रिया सोनवणे, दिपाली कोळी हे विद्यार्थी सहभागी होते.

“शिवनेरी किल्ला” निर्मितीत साई पाटील, कल्पेश पाटील, अतुल पारधी, रोहित पारधी, कल्पेश नगराळे, सचिन लोंढे, भूषण कोळी, धनश्री पारधी, भाग्यश्री पारधी, भाग्यश्री दाभाडे, गायत्री तिरमले, किमया पाटील, कावेरी पाटील, प्राची पाटील, दिव्याणी पाटील हे विद्यार्थी सहभागी होते.

शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले पवित्र क्षेत्र ‘किल्ले शिवनेरी’ व अफजल खानाचा वध करुन “शक्तीपेक्षा युक्ति श्रेष्ठ” व गनिमी काव्याची प्रचिती देणारे प्रेरक क्षेत्र ‘किल्ले प्रतापगड’ या महाराष्ट्रातील दोन ऐतिहासिक प्रेरक वास्तूंच्या प्रतिकृती त्यावरील पायऱ्या, प्रवेशद्वार, माची, तटबंदी, बुरुज, घरे, विहीर, हौद, तोफ, पहारेकरी, मावळे, हत्ती, कापडी झेंडे इ.शिवकालीन ऐतिहासिक नजारा विद्यार्थ्यांमधील गुण हेरुन त्यांच्या कल्पकतेने व कार्यकुशलतेने हॅण्डमेड साहित्य तयार करुन वॉटरबेस कलर व रांगोळीचा यथायोग्य वापर करुन विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वयातून नजरेत भरणारे आकर्षक किल्ले पुर्णत्वास आले. किल्ले निर्मितीच्या या बालसुलभ कृतीत विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षिका वंदना सोनवणे व उपशिक्षक रविंद्र पाटील यांनीही किल्ल्याची डिझाईन, त्यावरील साहित्यांची मांडणी व सजावट यासाठी वेळोवेळी मातीकाम, रंगकाम यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून फायनल टचअप करेपर्यंत बारीकसारीक एक एक गोष्ट एकमेकांच्या विचारविनिमयातून व सहृदयतेने मातीपासून किल्ले निर्मितीचा बाल्यकाल अनुभवला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!