
अमळनेर : मराठा सेवा संघाच्या रविवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक बैठकीत तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करून प्रमुख चार पदांची निवड करण्यात आली. यात, तालुकाध्यक्षपदी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे, सचिवपदी प्रेमराज पवार, कार्याध्यक्षपदी अशोक साळुंखे तर उपाध्यक्षपदी बापूराव ठाकरे यांची निवड झाल्याचे प्रा. लिलाधर पाटील व प्रा. डॉ. विलास पाटील यांनी बैठकीत जाहीर केले. माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत चिखलोदकर व शिवश्री कैलास पाटील यांनी संघ कार्याची धुरा नवीन कार्यकारिणी कडे सुपूर्द केली.
‘मराठा सेवा संघ ही राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे एक प्रभावी सामाजिक संघटना असून या विचारधारेशी प्रामाणिक राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करेल’ असे मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी व्यक्त केले. यावेळी १९ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले. पुढील महिन्यात होणाऱ्या मासिक बैठकीत उर्वरित कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे तालुका सचिव प्रेमराज पवार यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!
