
पारोळा : तालुक्यातील भोकरबारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी फाऊंडेशन अमळनेर, पंचायत समिती पारोळा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद जळगाव, आणि ग्रामपंचायत भोकरबारी यांचे संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन योजने बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सामूहिक पाणी बचत व जल प्रतिज्ञा उपस्थित सर्व ग्रामस्थांना देण्यात आली. प्रतिज्ञेचे वाचन मुळे मॅडम यांनी केले. १० टक्के लोकवर्गणीतून पाणी पुरवठा योजना बाबत माहिती देण्यात आली. सांड पाणी व घनकचरा संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमास सरपंच राहुल तुकाराम पाटील, उपसरपंच पूनम विश्वास गव्हाणे, ग्रामसेवक प्रवीण बापू अमृतकर, तलाठी योगेश बैसाने, सदस्य दीपक पाटील, युवराज सोनवणे, यशोदा पाटील, रंजनाबाई पाटील, मंगलबाई पाटील, शिक्षक व ग्रामस्थ साने गुरुजी फौंडेशन चे कार्यकर्ते जगदिश पाटील, पवन साळुंखे आदी उपस्थित होते.