अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी सुरेश आसाराम पाटील यांचे आज शनिवार, ता.१५ जानेवारी रोजी पहाटे २.१५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. मकरसंक्रांतीला गावात सर्वाना तिळगुळ देऊन अचानक झालेली त्यांची एक्झीट सर्वांनाच हुरहुर लावून गेली. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर गावातील स्मशान भूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रियाविधी, गंधमुक्ती व उत्तरकार्य कार्यक्रम सोमवार, ता.२४ रोजी खवशी येथे आयोजिलेेेला आहे.