प्रताप मिल कंपाऊंड परिसरात रक्तदान शिबिर संपन्न

मराठा सेवा संघ व शिवरथ प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : शिवजयंती चे औचित्य साधून मराठा सेवा संघ व शिवरथ प्रतिष्ठान, अमळनेेर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी प्रताप मिल कंपाऊंड परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरासाठी धुळे येथील नवजीवन रक्तपेढीचे अनमोल सहकार्य लाभले. विशेष म्हणजे रक्तदान शिबिरा वेळी अनेक महिलांचे रक्तगट, हिमोग्लोबीनचे प्रमाण, वजन, रक्तदाब तपासणीदेखील करण्यात आली. रक्तदान शिबिरास माजी आमदार बी.एस.पाटील, विनोदभैय्या पाटील, भरत कोठारी, प्रवीण जैन, मनोहर निकम, लिलाधर पाटील, श्रीकांत चिखलोदकर, प्रशांत निकम आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

सुमारे पंचावन्न रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यात, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, सचिव प्रेमराज पवार, उपाध्यक्ष बापुराव ठाकरे, संजय सूर्यवंशी, संदीप वाघ, वाल्मीक पाटील, मोहसिन पिंजारी, संदेश पाटील, राजेंद्र सोनवणे, हेमंत शिंदे, अशोक पाटील, संदीप खैरनार, दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, विशाल देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण पाटील, राजेश सैंदाणे, प्रवीण पाटील, हर्षल खैरनार, कुणाल पवार, प्रथमेश सोनवणे, कैलास पाटील, कुणाल चौधरी, गणेश पाटील, प्रदीप सूर्यवंशी, हेमंत पाटील, नंदकिशोर पाटील आदींनी सहभाग घेतला. सर्व रक्तदात्यांना नवजीवन रक्तपेढी तर्फे प्रमाणपत्र, फ्रुटी, बिस्किटे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ, शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापनगर परिसरातील रहिवाशी तसेच नवजीवन रक्तपेढीचे डॉ.गजानन चौधरी, रोहिदास जाधव, चंद्रकांत दंडगव्हाण पांडुरंग गवळी, गणेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!