
मारवड : कवयित्री बहिणाबाई चौधरी उ. म. विद्यापीठ, जळगाव आणि कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालय, मारवड मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वसंत देसले तर प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.पवन पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी जळगाव जिल्हा समन्वयक कबचौ उमवि जळगाव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाद्वारे जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्यक्त केलेल्या भावनांवर प्रकाश टाकणारे विचार मांडण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन द्वितीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थीनी कु. प्राजक्ता निकम हिने केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे आभार विद्यार्थीनी कु.किरण साळुंखे हिने मानले सदर कार्यक्रम घेण्यासाठी ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी परवानगी देऊन अनमोल असे सहकार्य केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य कले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.