अमळनेरमध्ये ‘प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन २०२६’ ला जनतेसोबतच विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद; ७५ संस्थांचा सहभाग

प्रदर्शनात उद्योगाच्या अनेक योजना मिळतील : मंत्री संजय सावकारे


(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. राज्य सरकारने २३५ तालुक्यात तो जाहीर केला असून आणखी काही तालुके वाढणार आहेत. दुष्काळाचा फटका शेतीला बसताना खा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ‘प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शन २०२६’ भरविण्यात आले आहे. यात, तरुणांनी नवनव्या कल्पना आत्मसात करून आपापले स्टार्टअप सुरु, करावेत असे आवाहन महाराष्ट्राचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. येथील कलागुरू मंगल कार्यालयात काल दि.७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचे थाटात उद्धघाटन झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर खा. स्मिताताई वाघ, रावेरचे आमदार अमोल जावळे, विधान परिषद आमदार नंदुभाऊ महाजन, खानदेश शिक्षण मंडळ चेअरमन निरज अग्रवाल, मुनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सरवर, यंत्रा इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल, भाजपा मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, भाजपा कृषी आघाडीचे श्रीनिवास मोरे, फ्रेंड्ज एक्झिबिशनचे चेअरमन आनंद पाल, अखिला श्रीनिवासन, दिपकसिंग मेहता, भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कृतिका अप्रे , भारती सोनवणे, डीसीसी च्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी विजयनाना पाटील आर्मी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केलेले संचलन लक्षवेधी ठरले.

खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, गेल्या वेळी जळगाव येथे हे प्रदर्शन भरविले होते. यावेळी मुद्दाम अमळनेरमध्ये भरविले आहे. ग्रामीण लोकांपर्यंत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना पोहोचाव्यात म्हणून हा उपक्रम घेतल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार अमोल जावळे व आमदार नंदुभाऊ महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात यूनियन बैंक ऑफ इंडियाच्या वतीने मंगरुळ येथील मयत शेतकरी बापू साहेबराव पाटील यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतून मंजुर झालेल्या दोन लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमळनेर शहरातील सर्व व्यापारी आणि एमआईडीसी उद्योजकांनी खा. स्मिताताई वाघ यांच्या समवेत चर्चा केली. यात त्यांनी आपल्या विविध अडचणी मांडत तालुक्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक उपाय योजनांवर चर्चा केली. खा.वाघ यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रदर्शनात केंद्र व राज्याच्या ७५ संस्थाचा सहभाग…

या प्रदर्शनात केंद्र आणि राज्य पातळीवरील ७५ हुन अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यातील प्रमुख संस्थामध्ये कर्नाटक साबुन एवं डिटर्जेंट लिमिटेड, भारतीय पैकेजिंग संस्थान, जैव प्रौद्योगिकी विभाग, वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषद, भारतीय मानक ब्यूरो, कृषि राज्य सहायता, महाराष्ट्र बाँस विकास मंडल, राष्ट्रीय बीज निगम, भारतीय रेलवे खानपान एवं पर्यटन निगम लिमिटेड, काजू एवं कोको विकास निदेशालय, महाजेनको, भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ, त्रिपुरा चाय विकास निगम लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण, डाक विभाग, नाडा इंडिया, केंद्रीय सिद्ध अनुसन्धान परिषद्, भारतीय रेशम चिह्न संगठन, भारतीय समुद्री विश्वविद्यालय, कृषक भारती कोऑपरेटिव लिमिटेड, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई, राष्ट्रीय बागवानी बोर्ड, डिजिटल इंडिया भाषिणी प्रभाग, राष्ट्रीय अनुसूचित जनजाति वित्त एवं विकास निगम, केंद्रीय मात्स्यिकी नौचालन एवं इंजीनियरिंग प्रशिक्षण संस्थान, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, भारतीय रिज़र्व बैंक, केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान, विपणन एवं निरीक्षण निदेशालय, नेशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड, म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड, नाबार्ड, विकास आयुक्त हथकरघा, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ईसीजीसी लिमिटेड, बीरबल साहनी पुराविज्ञान संस्थान, भारतीय चाय बोर्ड, लघु उद्योग विकास बैंक ऑफ इंडिया, मृदा एवं भूमि उपयोग सर्वेक्षण संस्थान, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-गवर्नेंस प्रभाग, इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारतीय स्टेट बैंक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचा समावेश आहे.

सुरु असलेल्या या प्रदर्शनाला अमळनेर शहर आणि पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार जणांनी भेट दिली. विविध शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रस्ताविक केले. संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माजी जि. प. सदस्य संदीप पाटील यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!