अमळनेेर : येथील प्रतापनगर मधील रहिवासी तथा ग्रामीण रूग्णालय, अमळनेर येथे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री भगवान नारायण काळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बन्सीलाल पॅलेस येथे सेवापूर्ती सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती भगवान काळे व त्यांची धर्मपत्नी सौ.जयश्री काळे यांचेसह प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामीण रूग्णालय अमळनेर चे डॉ.प्रकाश ताळे, डॉ.जी.एम.पाटील, डॉ.देविदास भोळे, डॉ.एन.के.कोल्हे, डॉ.अमोल वाटपाडे, शांताराम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी काळे कुटुंबियांनी आलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. तसेच मान्यवरांचे हस्ते सत्कारमूर्ती भगवान काळे व त्यांची धर्मपत्नी सौ.जयश्री काळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पमाळा देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामीण रूग्णालय, चिपळूण येथे १० वर्षे व अमळनेर येथे २४ वर्षे अशी एकूण सलग ३४ वर्षे आरोग्य सेवा देऊन दि.३० एप्रिल २०२२ रोजी डॉ.काळे सेवानिवृत्त झाले. असोदा (जळगाव) हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास असलेल्या उपस्थितीने त्यांच्यावरील प्रेमाची साक्ष दिली.
सर्वांकडून मिळालेले प्रेम, सदिच्छा, आशिर्वाद व आपलेपणा बद्दल सर्वांचा ऋणी राहू अशी भावना डॉ. काळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यक्रमात डॉ.प्रकाश ताळे, डॉ.जी.एम.पाटील, डॉ.गणेश पाटील, नितीन कोल्हे, सुनिल चौधरी, बापूराव ठाकरे, डॉ.सायली वाटपाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री अजय रोडगे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शुभेच्छा देण्यास त्यांचे कुटुंबीय, ग्रामीण रुग्णालयातील सहकारी वर्ग, प्रतापनगर वासीय, मित्र परिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.