अमळनेर : येथील दाऊदी बोहरा समाजातर्फे नुकताच (दि.३) रोजी रमजान ईद निमित्त ‘ईद ए मिलन’ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील उपस्थिती होती. सदर कार्यक्रम हा सकाळी बुरहानी मेन्शन अहमदी बुरहानी यांचे नर्मदा वाडीजवळील निवासस्थानी घेण्यात आला होता. संध्याकाळी ईद मिलन चा कार्यक्रम ताहा बुकवाला यांच्या निवासस्थानी होता. जगात शांतता व प्रेम टिकून राहण्याकरिता उपस्थितांनी प्रार्थना केली. सर्व मान्यवरांनी प्रेम बंधुभाव टिकून राहण्यासाठी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. अमळनेर शहरात सर्व धर्म समभाव वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अमील साहेब शेख हुसेन भाई जाकीर यांचे हस्ते मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शीरखुर्मा पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.
याप्रसंगी न.पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, न.पा. प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नगरसेवक मनोज पाटील, काँग्रेसचे गोकुळ आबा, विनोदभैय्या पाटील, नगरसेवक राजेश बापू, पत्रकार चेतन राजपूत, सोमचंद संदानशिव आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सर, पोलीस नाईक डॉक्टर शरद पाटील, ईशी दादा, सुनील पाटील, मुस्लीम बांधवांतर्फे रियाज मौलाना, अखलाक मौलाना, आबिद मिस्त्री, इक्बाल शेख आदी उपस्थित होते. अध्यक्ष शेख एहसानभाई बुर्हानी, शेख अली हुसेन, शेख मोहम्मद भाई करंपुरवाला खास उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वितेकरिता बुरहानी गार्डचे कॅप्टन ताहा बुकवाला, व्हाईस कॅप्टन अजिज बोहरी, हुसेन बोहरी, अब्दुल कादिर जावेद, हुजेफा इजी, अलीअसगर बोहरी, अलीअसगर अल्लाबक्ष, अब्दुल कादिर सैफी, मुस्तफा कलकत्तावाला यांनी विशेष प्रयत्न केले.