अजेंड्याप्रमाणे सभेची वेळ न पाळता झाली पदाधिकारी निवड व सत्काराचा कार्यक्रम
अमळनेेर : तालुक्यातील खौशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, खौशी या संस्थेची चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाधिकारी निवडीबाबत काल दि.८ मे रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी आर.यु.पाटील होते. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत माजी सरपंच डॉ.श्यामकांत विनायक देशमुख यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी नरेंद्र नारायण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक, सचिव भरत पाटील हजर होते.
सर्व नवनिर्वाचित संचालकांना विश्वासात न घेता, पदाधिकारी निवड केल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. सभा अजेंड्याप्रमाणे सभेची वेळ सकाळी ११ वाजता होती परंतु सकाळी १०.४५ पूर्वीच पदाधिकारी निवड व सत्काराचा कार्यक्रम आटोपण्यात आला होता. यामुळे सकाळी १०.४५ नंतर आलेल्या संचालक पुत्राने अध्यासी अधिकारी यांना याबाबत जाब विचारला. ऊन्हामुळे सर्व उपस्थित संचालकांच्या अनुमतीने सभा पार पाडल्याचे उत्तर देत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. एका जबाबदार अधिकाऱ्याने वेळेचे भान राखत आपली भूमिका योग्य रितीने पार पाडायला हवी होती. तात्त्विक वाद वगळता झालेल्या पदाधिकारी निवडीस सर्वांनी अनुुमोदन दिले. दिव्यचक्र परिवारातर्फे नवीन पदाधिकाऱ्यांचेे अभिनंदन !