शांतता, शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला करावे : संत प्रसाद महाराज
अमळनेर : येथील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे यात्रोत्सव बंद होता. यात्रेच्या निमित्ताने श्री संत प्रसाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी यात्रोत्सव होणार असल्याने भाविकांसह व्यावसायिक आनंदी आहेत. अनेक हातांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
मंदिर परिसरात तयारी सुरू आहे. यात्रेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर नागरिकांवर असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर उपविभागीय अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
उत्तर महाराष्ट्रातून अनेक भाविक नवस फेडण्यासाठी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या यात्रोत्सवात येत असतात. यात्रेमध्ये अनेक हौशी मंडळी आपला आनंद द्विगुणीत करत असतात. नगरपालिका कर्मचारी यात्रेच्या निमित्ताने नदीत स्वच्छता मोहीम राबविताना दिसत आहे. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा. शांतता आणि सुव्यवस्था शिस्त यासाठी नागरिकांनी प्रशासनाला करावे असे आवाहन संत प्रसाद महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
…उत्सवातील कार्यक्रम असे…
तुकाराम महाराज गाथा भजन – भजन नेतृत्व ह.भ.प सारंगधर बुवा, वाघ बुवा, पंढरीनाथ कागणे, सुदाम पाटील. भजनी मंडळ साथ संत सखाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था अमळनेर विद्यार्थी भजनी मंडळ
सांगता बुधवार ११ मे २०२२ सकाळी ९ ते १२ वैशाख शु १० बुधवार, ११ मे २०२२ सकाळी ७.३० मिनिटांनी ह. भ प मोहन महाराज बेलापुरकर यांचे दिंडीचे आगमन, वैशाख शुद्ध ११ मोहिनी एकादशी गुरुवार, दिनांक १२ मे २०२२ रथोत्सव सायंकाळी ७.३० विविध कला प्रदर्शन १२ मे २०२२ आदिवासी संस्कृती कला मंडळ माळीवाडा ता.बागलाण जि.नाशिक, सुरेश आहिरे आणि मंडळी..
रविवारी १५ मे २०२२ संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्ताने सर्व रोग निदान शिबीर सायंकाळी ५ ते ७ स्थळ – भक्त निवास वाडी चौक, अमळनेर.
वैशाख शु.१५ सोमवार, दि.१६ मे २०२२ पालखी सोहळ्याची साथ भुसावळ येथील प्रसिद्ध बँड पथक करतील. अंतर्गत वेळ सकाळी ७ ते २ स्वराज्य ग्रुप नाशिक यांचे मर्दानी खेळ असतील..
मंगळवार, दि.१७ मे सकाळी १० ते १२ ह.भ.प मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे किर्तन व उत्सवाची सांगता होईल.
…विशेष कार्यक्रम…
१२ मे २०२२ सकाळी ९ ते ११ सुवर्णा सचिन कुलकर्णी पुणे यांचे नारदीय किर्तन सेवा
१३ ते १५ मे २०२२ सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प लक्ष्मीप्रसाद शंकराव पटवारी, माजलगांव जिल्हा बीड यांचे नारदीय किर्तन
१३ मे २०२२ सौ अनिता जोशी औरंगाबाद यांचे नारदीय किर्तनाचा कार्यक्रम दुपारी ३ ते ५
१४ मे २०२२ स्थानिक महिला व कलाकार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ९ ते ११ सायंकाळी ८.३० ते १०.३०
१५ मे २०२२ सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ सखाराम माऊली भक्ती संगीताचा कार्यक्रम दत्त भजनी मंडळ, अमळनेर
अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी श्री संत सखाराम महाराज विश्वस्त मंडळ व भाविक परिश्रम घेत आहेत.