ग.स.सोसायटी निवडणूक संपली; वर्चस्वासाठी रस्सीखेच

जळगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था अशी ओळख असलेली जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगाव अर्थातच ग.स.सोसायटी. गेली अनेक दिवस या संस्थेच्या सन २०२२ ते २०२७ कालावधीसाठी निवडणुक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. दि.२८ एप्रिल रोजी २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पाच पॅनल व अपक्ष मिळून एकूण ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साहजिकच चुरस वाढली. काल दि.३० एप्रिल रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उशिरापर्यंत मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यात, तीन पॅनल ला यश मिळाले असून कोणाकडेही बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. सहकार पॅनल नऊ (९) जागा जिंकून आघाडीवर असले तरी लोकसहकार व प्रगती पॅनल ला प्रत्येकी सहा (६) जागा मिळाल्या आहेत. यामुळे बहुमतासाठी रस्सीखेच होऊन पतसंस्थेच्या कारभाराची धुरा कोणाकडे जाईल हे वेळच सांगेल. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालातून विजयी झालेले उमेदवार याप्रमाणे…

अनुसूचित जाती/ जमाती मतदारसंघ (SC/ST)
विजय पवार (प्रगती शिक्षक सेना)

वि.जा.भ.ज.व. विमाप्र मतदारसंघ (NT/ VJNT)
ए.टी.पवार (प्रगती शिक्षक सेना)

इतर मागासवर्गीय मतदारसंघ (OBC)
रावसाहेब मांगो पाटील (प्रगती)

स्थानिक मतदारसंघ
उदय मधूकर पाटील (सहकार), अजबसिंग पाटील (सहकार), सुनिल सुर्यवंशी (लोकसहकार), मनोज माळी (प्रगती), योगेश सनेर (प्रगती)

महिला राखीव मतदारसंघ
प्रतिभा सुर्वे (लोकसहकार) व रागिणी चव्हाण (सहकार)

बाहेरील मतदारसंघ
अजय सोमवंशी (लोकसहकार), महेश पाटील (सहकार), रविंद्र सोनवणे (लोकसहकार), भाईदास पाटील (सहकार), ज्ञानेश्वर सोनवणे (लोकसहकार), योगेश इंगळे (सहकार), अनिल गायकवाड (लोकसहकार), अजय देशमुख (सहकार), विश्वास पाटील (सहकार), निलेश पाटील (प्रगती), मंगेश भोईटे (सहकार)

सर्व विजयी उमेदवारांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!