महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पो.कॉ.शरद पाटील सन्मानित

महाराष्ट्रदिनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान

जळगाव : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री रजनीश शेठ यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आठशे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले. त्यात, अमळनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील यांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

शरद पाटील हे अमळनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असून त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी जबरी चोरी, खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणणेकामी मोलाची कामगिरी पार पाडली आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!