प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्याचा प्रॅक्टिकल सुरू असताना दुर्दैवी मृत्यू

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या निलेश झुंबरलाल पाटील या विद्यार्थ्याचा मंगळवारी (दि.२६) दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. निलेश हा लोंढवे ता.अमळनेर येथील झुंबरलाल काळू पाटील यांचा मुलगा असून सध्या पिंपळे रोड, अमळनेेर वरील विवेकानंद नगर येथे परिवारासोबत राहत होता. निलेशचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी असून सध्या सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत.

निलेश चक्कर येऊन खाली पडताच वर्गमित्र, विभागातील प्राध्यापक व कर्मचारी घटनास्थळी धावले. निलेशला तात्काळ अमळनेर येथील डॉ.निखिल बहुगुणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तपासणी केली असता, निलेशला मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात डॉ. आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले. निलेशचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदनातुन समोर आली आहे. निलेश च्या निधनामुळे प्रताप महाविद्यालयाने दुपारी अर्धा दिवस सुटी जाहीर केली होती. निलेशच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!