खवशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

अर्ज माघारीनंतर चार उमेदवार बिनविरोध

अमळनेेर : तालुक्यातील खवशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने निर्विवाद आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले परंतु काहीसे अपयश आले. यापूर्वीच अर्ज माघारीनंतर महिला राखीव मतदार संघातून श्रीमती यमुनाबाई उत्तम पाटील व उषाबाई पितांबर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गीय मतदार संघातून भागवत केशव सूर्यवंशी यांची तर वि.जा.भ.ज.व.विमाप्र NT मतदार संघातून महेंद्र हरिश्चंद्रपूरी गोसावी यांची बिनविरोध निवड झाली होती. निवडणूक झाल्यानंतर पॅनलचे प्रमुख श्यामकांत देशमुख यांचेसह सर्व १३ उमेदवार विजयी झाले. प्रतिस्पर्धी म्हणून कोणतेही पॅनल नव्हते. कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदार संघात दोन व अनुसूचित जाती जमाती SC मतदार संघात एक अशा फक्त तीन प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवारांनी लढत दिली. तीनही अपक्ष उमेदवार पराभुत झाले. यांत विजयी / पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी …

कर्जदार खातेदार प्रतिनिधी (सर्वसाधारण)

विजयीउमेदवार : देशमुख श्यामकांत विनायक (१३४), पाटील चंद्रदीप आधार (१२२), पाटील गजानन नाना (१३५), पाटील कैलास मुरलीधर (११०), पाटील नरेंद्र नारायण (१३५), कापडे सुर्यकांत बळीराम (१४६), पाटील विश्र्वास वामन (११४), पाटील चंद्रकांत दंगल (१३६), पराभूत उमेदवार : गोसावी भगवान छगनपूरी (७८), शिरसाठ पंडीत मोतीराम (४१), बाद मते : १२

अनु.जाती / जमाती SC

विजयी उमेदवार : पवार सुमनबाई मधुकर (१२८), पराभूत उमेदवार : शिरसाठ पंडीत मोतीराम (३८) बाद मते : २४

बिनविरोध विजयी उमेदवार

यापूर्वीच अर्ज माघारीनंतर महिला राखीव मतदार संघातील श्रीमती देशमुख सीमा जगदीश, पाटील पुष्पाबाई रोहिदास, पाटील लताबाई भागवत, पाटील मिराबाई आनंदा यांनी माघार घेतल्याने महिला राखीव मतदार संघातून श्रीमती यमुनाबाई उत्तम पाटील व उषाबाई पितांबर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गीय मतदार संघात सूर्यवंशी संजय उत्तम, पाटील अनिल विनायक यांनी माघार घेतल्याने भागवत केशव सूर्यवंशी यांची तर वि.जा.भ.ज.व.विमाप्र NT मतदार संघात गोसावी भगवान छगनपूरी यांनी माघार घेतल्याने महेंद्र हरिश्चंद्रपूरी गोसावी यांची बिनविरोध निवड झाली होती.

यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनल प्रमुख असणारे भागवत सूर्यवंशी यांनी निवडणूक जाहीर होताच सहकार पॅनलशी जुळवून घेत सहकार पॅनलमध्ये प्रवेश केल्याने सहकार पॅनल विरोधात फक्त तीन अपक्ष उमेदवार होते. इतर मागासवर्गीय मतदार संघात सूर्यवंशी संजय उत्तम व भागवत केशव सूर्यवंशी यांच्यात चुरशीची लढत होईल असे चित्र असताना आईच्या बिनविरोध विजयासाठी संजय सूर्यवंशी यांनी माघार घेतली. साहजिकच सहकार पॅनल निवडणूकीपूर्वीच जिंकल्याची सर्वांना खात्री होती. असे असताना प्रतिस्पर्धी तीन अपक्ष उमेदवारांनी खचून न जाता आपला स्वाभिमान जागवला. कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदार संघात गोसावी भगवान छगनपूरी, शिरसाठ पंडीत मोतीराम व अनुसूचित जाती जमाती SC मतदार संघात शिरसाठ पंडीत मोतीराम अशा तीन प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवारांनी लढत दिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.यु.पाटील यांनी काम पाहिले. सर्व विजयी उमेदवारांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!