मराठा सेवा संघाची अमळनेर तालुका व शहर कार्यकारिणी घोषित

तालुकाध्यक्ष पदी रामेश्वर भदाणे तर शहराध्यक्ष पदी कुणाल पवार

अमळनेर : येथील मराठा सेवा संघाच्या नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत अमळनेर तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. रामकृष्ण बाविस्कर यांचे ढेकू रोडवरील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ मान्यवर जयवंतराव मन्साराम पाटील, विक्रांत पाटील, संजय कृष्णा पाटील, अरुण देशमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना गायिली.
घोषित तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..‌.
रामेश्वर तुकाराम भदाणे (अध्यक्ष), अशोक रघुनाथ पाटील (कार्याध्यक्ष), बापूराव आनंदराव ठाकरे (उपाध्यक्ष), प्रा.डॉ.पी.एस.पाटील (उपाध्यक्ष), प्रेमराज पुंडलिक पवार (सचिव), अॅड.उदय अर्जुन शिसोदे (सहसचिव), संदीप पुंडलिक खैरनार (संघटक), उदय रमेशराव पाटील (सहसंघटक), इंजि.उज्वल शंकर पाटील (कोषाध्यक्ष), संजय उत्तम सूर्यवंशी (प्रसिध्दीप्रमुख), कार्यकारिणी सदस्य : चंद्रकांत भिला पाटील, डॉ.गणेश पंढरीनाथ पाटील, राजेंद्र नारायण पाटील, अनिल विनायक पाटील, गंगासागर हिंमतराव वानखेडे. ज्येष्ठ मार्गदर्शक : मनोहर नाना, प्रा.लिलाधर पाटील, प्रा.डॉ.विलास पाटील, प्रा.बी.ए.पाटील.
घोषित शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..‌.
कुणाल मुरलीधर पवार (अध्यक्ष), दिपक रमेश काटे (कार्याध्यक्ष), अनंत धर्मराज सूर्यवंशी (उपाध्यक्ष), प्रविण राजधर पाटील (उपाध्यक्ष), दिपक रामलाल पाटील (सचिव), खेमचंद्र सर्जेराव पाटील (सहसचिव), लक्ष्मण नथ्थू पाटील (संघटक), योगेश लक्ष्मण भदाणे  (सहसंघटक),  (कोषाध्यक्ष), अमोल रामलाल पाटील (प्रसिध्दीप्रमुख), कार्यकारिणी सदस्य : नरेंद्र राजाराम पाटील, दिलीप ठेकेदार ज्येष्ठ मार्गदर्शक : कैलास रामदास पाटील
कार्यक्रमात अमळनेर तालुका मराठा समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयवंत मन्साराम पाटील, उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील, विक्रांत पाटील, कैलास पाटील यांचा  पदाधिकाऱ्यांचा मराठा सेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच यजमानपद स्विकारल्याबद्दल रामकृष्ण बाविस्कर व कुटुंबियांचाही ही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. लिलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले. पुढील काळात वर्षभर विविध सामाजिक, साहित्यिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाणार असून अमळनेर तालुक्याला उत्तम वैचारिक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघ करणार आहे. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी तर प्रेमराज पवार यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!