प्रा.आर.व्ही.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी ९ जागा राखत वर्चस्व
पारोळा : तालुक्यातील रत्नापिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता होती. मात्र या निवडणूकीत प्रा.आर.व्ही.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले परंतु काहीसे अपयश आले. यापूर्वीच वि.जा.भ.ज.व.विमाप्र NT मतदार संघातून एकच अर्ज आल्याने जगदीश वसंत मनोरे यांची बिनविरोध निवड झाली होती. १२ जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले. प्रतिस्पर्धी पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. यांत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी …
अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ
नारायण मांगो मोरे (३६१)
महिला राखीव मतदार संघ
मिराबाई मधुकर पाटील (३४०), निर्मलाबाई दिलीप पाटील (३४३)
सर्व साधारण कर्जदार मतदार संघ
शांताराम बनगर पाटील (३९६),रतिलाल वना पाटील (३८५), कैलास शांताराम बिरारी (३४९), संदीप मुरलीधर पाटील (३११), समाधान रमेश पाटील (३०९), जगदीश नाना पाटील (३०५), गणेश छगन पाटील (३०१), नारायण रघुनाथ पाटील (३०१)
इतर मागासवर्गीय मतदार संघ
संजय जगन्नाथ पाटील (३५४)
वि.जा.भ.ज.व.विमाप्र NT मतदार संघ (बिनविरोध)
जगदीश वसंत मनोरे
रविवार दिनांक २४ जुलै रोजी दबापिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत शांततेत मतदान पार पडले. पोलीस प्रशासनाने आपली चोख भूमिका पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ.एस.बी.सिंहले व सहकारी यांनी काम पाहिले. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ सतीश भास्करराव पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन सतिशराव पाटील, माजी सरपंच भिकन हिलाल पाटील, रमाकांत अभिमन पाटील, माजी सरपंच डॉ.ज्ञानेश्वर लांडगे, सुयोग मगन पाटील, गुलाब सजन पाटील, डॉ.प्रवीण पाटील, भिकन निंबा पाटील, प्रकाश आत्माराम पाटील, उपसरपंच अंकुश ज्ञानेश्वर भागवत, विश्वास लोटन पाटील आदी उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!