ग्रामपंचायतीला शवपेटी भेट देत राबविले विविध लोकोपयोगी कार्यक्रम
चोपडा : तालुक्यातील मंगरूळ येथील मूळ रहिवासी बापूराव आनंदराव ठाकरे (ह.मु.प्रतापनगर, अमळनेेर) यांच्या मातोश्री कै.अंजनाबाई आनंदराव ठाकरे यांचे नुकतेच १२ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाकरे कुटुंबियांनी विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवून आपले दातृत्व निभावले. मंगरूळ ता.चोपडा येथे कै.आनंदराव तुळशीराम ठाकरे आणि कै.अंजनाबाई आनंदराव ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार ता.२४ जुलै रोजी किर्तनकार ह.भ.प. सौ.प्रतिभाताई सोनगीरकर यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
गंधमुक्ती व उत्तरकार्याचे दिवशी सोमवार ता.२५ जुलै रोजी मंगरूळ ता.चोपडा ग्रामपंचायतीला शवपेटी भेट देण्यात आली. त्यानंतर जीवन शिक्षण विद्या मंदिर, मंगरूळ येथील १४३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी चोपडा सह. साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, मंगरुळ येथील सरपंच सौ.उज्ज्वला ताई ठाकरे, पांडुरंग महाजन, अमळनेर अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन प्रविण पाटील, अमळनेेर न.पा.चेआरोग्य सभापती श्याम पाटील, ग्रामसेवक महाजन भाऊसाहेब, वि.का.सो.चेअरमन प्रकाश ठाकरे, संजय ठाकरे, सुदामराव ठाकरे, संभाजी सैंदाणे, किशोर सोनवणे, विलास पवार, सुनिल ठाकरे, कैलास पाटील, आबा चौधरी, संजय कुंभार, अनंत सूर्यवंशी, दिलीप ठेकेदार, नरेंद्र अहिरराव, संदीप पवार, आशिष पवार, सुरेश पवार, शेखर ठाकरे, जितेंद्र ठाकरे, अनिल पाटील मुख्याध्यापक, एकनाथ पाटील, प्रशांत पाटील, सौ.ललिता साळुंखे, सौ.मिनाक्षी पाटील, सौ.पाटील मँडम, अमोल ठाकरे (चेअरमन शा.व्य.समिती) तसेच ठाकरे परिवारातील प्रताप ठाकरे, बापूराव ठाकरे, मनोज ठाकरे, शरद ठाकरे, कुटुंबिय आणि ग्रामस्थ उपस्थित होते.