कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे प्रा.लिलाधर पाटील यांना पी एचडी पदवी प्रदान

धनदाई वरिष्ठ महाविद्यालयात अनेकांनी केला सत्कार

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे येथील धनदाई महाविद्यालयातील प्रा.लिलाधर पाटील यांना नुकतीच डॉक्टरेट अर्थात पी एचडी पदवी प्राप्त झाली. विद्यापीठाचे विद्यमान प्र.कुलगुरू प्रा.एस. टी. इंगळे यांच्या हस्ते तसेच मानव्यविद्याशाखेचे डिन प्राचार्य प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत प्रा लिलाधर पाटील यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. प्रताप महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य ज्योती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कन्स्ट्रक्शन ऑफ अ सबालटर्न डिसकोर्स इन द रायटिंगज ऑफ जोतीराव फुले अँड ताराबाई शिंदे’ या विषयावर त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. या विषयात महात्मा जोतीराव फुले यांना एक साहित्यिक व समाज सुधारक म्हणून नेहमीच गौरवण्यात आले आहे. परंतु त्यांच्या लिखाणातून त्यांनी भारतातील शोषणाचा जात, वर्ग व लिंगभावातून शोध घेऊन शोषित व अंकित जणांसाठी तत्त्वज्ञान निर्माण केले. हे तत्त्वज्ञान परंपरावादी अथवा स्थितिवादी नव्हते तर शोषितांसाठी ते मुक्तीदायी तत्त्वज्ञान ठरले या आशयाची मांडणी त्यांनी आपल्या शोध प्रबंधात केली आहे. याचबरोबर भारतातील पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांनी जोतीराव फुले यांनी दिलेल्या पद्धतीशास्त्राने महिलांच्या साहित्यातील व समाजातील निर्माण करण्यात येणाऱ्या प्रतिमेविरुद्ध मांडलेल्या विचारव्यूहाची सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.

धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, विद्यापीठ सिनेट सदस्य दिनेश नाईक, संचालक अमोल पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, युवकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार , म.सा.प. चे कार्यवाह रमेश पवार, खा.शि. मंडळाच्या विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील, लक्ष्मण पाटील, प्रा.डॉ.संदीप नेरकर, डॉ.माणिक बागले, डॉ.विलास पाटील, आदींनी प्रा.लिलाधर पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचा अमळनेर येथील धनदाई वरिष्ठ महाविद्यालयात नुकताच सत्कार केला. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही. एल. माहेश्वरी, इंग्रजी अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्षा प्रा.मुक्ता महाजन आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!