
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील मूळ रहिवासी माधुरीताई गोविंदराव कापडे यांचे आज शुक्रवार, ता.२९ जूलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या चोपडा येथील सिंचन विभागाचे वरिष्ठ लिपिक विजय गोविंदराव कापडे यांच्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या ता.३० जूलै रोजी सकाळी १० वाजता त्यांचे खौशी येथील राहत्या घरापासून नेण्यात येणार आहे.