संभाजी ब्रिगेडच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी श्याम जयवंतराव पाटील यांची नियुक्ती

जळगाव जिल्हाध्यक्ष पदी तुषार सावंत तर जळगाव शहर महानगराध्यक्ष पदी संदीप पाटील

अमळनेर : संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारणीची बैठक शिवाजी नगर, पुणे येथे नुकतीच दिनांक ३१ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच तुषार भगवान सावंत यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष पदी तर संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी कार्याध्यक्ष सुधीर भोसले, कोषाध्यक्ष अमोल काटे, महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष छगन शेरे व सोमेश्वर आहेर, सचिव आत्माराम शिंदे, संघटक प्रदीप कणसे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह खास, पुणे महानगराध्यक्ष हर्षवर्धन मगदूम उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करतांना जास्तीत जास्त मराठा – बहुजन समाजाच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून देश – विदेशात जाऊन आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी असे आव्हान करत येणाऱ्या काळात “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा” या संकल्पेच्या माध्यमातून २० लाख तरुणांना विदेशात स्थैर्य मिळवून देण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी बोलून दाखवला. दिव्यचक्र परिवारातर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!