अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प तयार करून देण्याचे आमदार अनिल पाटील यांचे आश्वासन

अमळनेर : मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू, इथली व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगून गेली असे सांगणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती अमळनेरात आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे रोडवरील अण्णाभाऊ साठे स्मारकावर याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, दीड दिवसाच्या शिक्षणावर ३५ कादंबऱ्या, ८ पटकथा, ३ नाटके, १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, १ प्रवासवर्णन, १२ उपहासात्मक लेख लिहून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांना अण्णाभाऊंनी वाचा फोडली आणि न्याय मिळवून दिला. अशा महापुरुषांची जयंती ही असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पाडणे गरजेचे आहे. समाजाला एकत्र करून सर्वांना त्यांचे जीवन कार्य सांगणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून मानवंदना देऊया. आणि पुढे येणाऱ्या जयंती अगोदरच अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प तयार करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.


सामाजिक कार्यकर्ते डी.ए.धनगर यांनी म्हणाले की, रशियाच्या चौकात जाऊन शिवरायांचे पोवाडे गाऊन शिवरायांचा इतिहास महात्मा फुले नंतर जर कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर तो शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केला आहे. प्रा अशोक पवार यांनी १५ ऑगस्ट ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आमचं काय ह्या देशात अजूनही २९ कोटी लोकांना खायला भाकरी नाहीत म्हणून हे स्वातंत्र्य नसून केवळ सत्तेचे हस्तांतरण आहे. म्हणून १६ ऑगस्ट ला मोर्चा काढून ‘ ये आ झुठी है.. देश की जनता भुकी है ‘ हा हुंकार अण्णाभाऊंनी फुंकला. जे आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही तंतोतंत लागू पडते.

अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यासाठी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, न.प.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पीएसआय भुसारे, आरोग्य अधिकारी संतोष बिऱ्हाडे, युवराज चौहान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष विजय गाढे, प्रा.डॉ.विजय तुंटे, प्रा.डॉ.जाधव, डी.ए.धनगर, डॉ निखिल बहुगुणे, डॉ.रुपेश संचेती, डॉ.दिनेश पाटील, डॉ.बालाजी कांबळे, डॉ.राजीव कांबळे आदींनी उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश कांबळे, हरीचंद्र कढरे गुरुजी, समाधान मैराळे, नारायण गांगुर्डे, जितेंद्र कढरे, बाजीराव कढरे, प्रेम बोरसे, राकेश खैरनार, किरण संदानशिव, प्रविण बैसाने, बाळासाहेब सोनवणे, आत्माराम अहिरे, फकिरा मरसाळे, मनोज बहिरम आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!