
मारवड : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमापूजन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय पाटील (मराठी विभाग प्रमुख) यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
