अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) उचलली पितृछत्र हरपलेल्या कु.कोमल चौधरीची शैक्षणिक जबाबदारी

अमळनेर : अलीकडेच इंदौर अमळनेेर बसला अपघात झाला. घडलेल्या या दुर्दैवी बस अपघातात १३ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यात, अमळनेर तालुक्यातील ५ जणांचा समावेश होता. अमळनेर आगारात वाहक असलेले प्रकाश चौधरी सदरील दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेने प्रकाश चौधरी यांची कन्या कु.कोमल चौधरी या विद्यार्थिनीची इ.११ वी व १२ वी ची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे.

उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांच्या कार्यालयात प्रांंताधिकारी सीमा अहिरे यांचेशी प्रत्यक्ष भेट देऊन क्लासेस संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी तशी अधिकृत घोषणा केली. यावेळी सीमा अहिरे यांच्या हस्ते कु.कोमल चौधरीला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कोमलचे पालक (काका) निलेश चौधरी, तसेच क्लासेस संघटना (PTA) अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर, फिजिक्स क्लासेसचे महेश बढे सर, सुमन अकौंटन्सी व केमिस्ट्री क्लासेसचे चंदुलाल बडगुजर सर, योगीराज Maths क्लासेसचे शिरीष डहाळे सर, अर्जुन बायोलॉजी क्लासेसच्या सौ.सोनल जोशी मॅडम तसेच एस.टी.महामंडळाचे कर्मचारी मनोज पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!