‘लायन्स’ ने दिला उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना छत्रीचा ‘आधार’

अमळनेर : लायन्स डिस्ट्रिक्ट कडून अमळनेेर येथील लायन्स क्लब व लिओ क्लबला छोट्या व्यवसायिक बंधूंना उपयुक्त ठरतील अशा मोठ्या दहा छत्र्या मिळाल्या आहेत. लायन्स व लिओ क्लबने गरजू व्यावसायिकांना त्या छत्र्यांचे नुकतेच वाटप केले आहे. शहरातील सुभाष चौक, गीता प्रोव्हीजन, सुदीप मेडिकल जवळ व शितलनाथ मंदिराजवळ उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या बंधूंना या छत्र्यांचे वितरण करण्यात आले. डिस्ट्रिक्ट कडून लायन्स क्लबला आठ तर लिओ क्लबला दोन छत्र्या प्राप्त झाल्या होत्या. उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिक बंधूंना या मोठ्या छत्र्यांमुळे सावली प्राप्त होणार असून दिवसभर उन्हामध्ये थांबून व्यवसाय करणे त्यांच्यासाठी काहीसे सुकर होणार आहे. लायन्स च्या या सेवाभावी उपक्रमामुळे लहान व्यावसायिकांना आधार मिळाला आहे.

यावेळी क्लबचे अध्यक्ष योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, डिस्ट्रिक्ट जीएसटी कॉर्डिनेटर रिजन २ एमजेएफ विनोद अग्रवाल, पंकज मुंदडे, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल, प्रकाश शहा, अभिनय मुंदडा, राजू नांढा, चेतन जैन, नीरज अग्रवाल, महेश पवार, प्रसन्न पारख, हितेश शहा, पीडीजी डॉ.रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!