डॉ.कपिलदेव पाटील यांची मुंबई पोलीस सर्जन पदी नियुक्ती

अमळनेर : चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी तथा वाशी ता.उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिलदेव पाटील यांची राज्य सरकारच्या मुंबई पोलीस सर्जन पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. पोलीस शल्य चिकित्सक हे पद सिव्हील सर्जन समकक्ष आहे. त्यांनी एम.डी व डीएनबी (फॉरेन्सिक सर्जन) पदवी यवतमाळ येथे प्राप्त केली असून संपूर्ण राज्यात अशा प्रकारे दोन्ही पदव्या घेतलेले ते एकमेव वैद्यकीय अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी वाघळी, यवतमाळ व शिरपूर येथील सरकारी रुग्णालयात आपली रुग्ण सेवा केली आहे. शिरपूर येथे कार्यरत असताना कोरोना काळात त्यांनी कविता व गाणी गात कोरोनाग्रस्त रुग्णांना धीर देत त्यांची सेवा केली. त्यानंतरच्या काळात तेथून त्यांची बदली उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथे करण्यात आली होती. संघर्षमय परिस्थितीतून वाटचाल करत ते पोलीस सर्जन झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.राजेश गायकवाड, डॉ.प्रमोद रक्षमवार, संघटक डॉ.प्रमोद सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!