
धुळे : भारतात गुरूला म्हणजेच शिक्षकाला आदराचे स्थान दिले आहे. शिक्षक राष्ट्रासाठी सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य करतो. गुरुची अनेक रूपे असून त्यापैकी एक म्हणजे शिक्षक आहे. दिनांक ५ सप्टेंबर.. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात ५ सप्टेंबर ला ‘शिक्षक दिवस’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याची जनजागृती व्हावी आणि शिक्षकांना भविष्यात राष्ट्रासाठी चांगले नागरिक घडविण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने ‘नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम’ तर्फे ‘आदर्श गुरुजन पुरस्कार २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांकडून नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ असून अधिक माहितीसाठी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे महाराष्ट्र अॅडिशनल डायरेक्टर जनरल प्रमोद रमेश पाटील यांच्याशी ९८८११९४८१६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
