धुळे : अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे ,की कितीही संकटे आली तरी ती त्यांच्यावर मात करते. मग तिचे काम वैयक्तिक पातळीवरचे असो किंवा सामाजिक पातळीवरचे असो. महिलांनी आपल्या कर्तुत्वाने समाजात नवीन स्थान निर्माण केले आहे म्हणून त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग, शिक्षण, संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, राजकीय, सामाजिक, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात कर्तृत्व दाखविलेल्या दुर्गांचा नवदुर्गा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत ॲडिशनल डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क क्रमांक ९८८११९४८१६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नामांकन अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. सदर नवदुर्गा सन्मान प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.