धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या दिवशी जयंती निमित्ताने संपूर्ण जगात जागतिक शांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जगाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यात महात्मा गांधी यांचे पर्यावरण, राष्ट्रीय एकात्मता, अहिंसा, शांतता, बंधुता, मानवता, स्वच्छता स्वावलंबन स्वदेशी, सत्य, अशा अनेक कार्यात योगदान दिले आहे. त्यांच्या या मानवतेच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत तर्फे महात्मा गांधी शांति पुरस्कार 2022 साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पुरस्कार साठी सामाजिक कार्य करणारे इच्छुक असलेल्यांनी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे ॲडिशनल डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र प्रमोद पाटील यांच्याशी ९८८११९४८१६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.