देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धा

अमळनेर : सत्यशोधक समाजाला आज १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात शाळा महाविद्यालयांमध्ये सत्यशोधक स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. जिल्हा परिषद माध्यमिक जळगाव यांच्या आदेशानुसार देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर व सत्यशोधक समाजावर वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सोबत व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन, क्रिडाशिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.

इयत्ता आठवी ते दहावीतील वीस विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. परिक्षक म्हणून एच ओ.माळी यांनी काम पाहिले. वत्कृत्व स्पर्धेत
प्रथम-श्वेता बैसाणे, द्वितीय-प्रणाली महाजन, तनूजा पाटील, स्नेहल पाटील इयत्ता दहावी यांच्या गिताला तर तृतीय रागिणी पाटील मयुरी महाजन, सोनाली महाजन, उन्नती गायकवाड इयत्ता आठवी यांच्या गिताला उत्तेजनार्थ, जयश्री पाटील नववी, राजश्री पाटील दहावी यांना कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे. शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी, एस.के.महाजन यांनी सत्यशोधक समाजाबद्दल मनोगत व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, समाज वर्णव्यवस्थेमध्ये विखूरला गेला होता. महात्मा फुले यांनी गुलामगिरी पुस्तकातून समाजातील दयनीय अवस्थेचे वर्णन करत समाजाची प्रगती होण्यासाठी खालच्या वर्गाची बुद्धीमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!