हिंदी अध्यापक मंडळाने तीन सेवानिवृत्त हिंदी शिक्षकांची ‘जीवन गौरव पुरस्कार’ साठी केली निवड

बक्षीस समारंभ सोहळ्यात दिले जाणार पुरस्कार

अमळनेर : अमळनेर तालुका हिंदी अध्यापक कार्यकारणी मंडळाची सहविचार सभा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संघटनेच्या स्थापनेस १५० वर्षे पूर्ण झाल्याने सभेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अमळनेर तालुका ‘हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कार’ साठी तीन सेवानिवृत्त हिंदी शिक्षकांची निवड करण्यात आली. कोरोना काळातील राहिलेले दोन पुरस्कार आणि चालू वर्षाचा एक पुरस्कार असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी डी.आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका सौ.भारती भांडारकर, जी.एस.हायस्कूल,अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका श्रीमती एन.आर.वानखेडे, स्व.आक्कासो कमलबाई विनायक पाटील सार्वजनिक विद्यालय,सारबेटे येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षक आर.के.निकम यांची निवड करण्यात आली.

यासोबतच हिंदी दिनानिमित्त शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर आणि अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत तालुक्यातील ४५ माध्यमिक शाळांमधून २६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल मुख्याध्यापक, हिंदी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले. निबंध स्पर्धेच्या ग्रामीण विभागातील शाळेतील निबंधांचे परीक्षणासाठी परीक्षक म्हणून प्रताप कॉलेजच्या हिंदी विभागातील प्रा.डॉ. कल्पना पाटील आणि शहरी विभागातील शाळेच्या निबंधाच्या परीक्षणासाठी शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील कवी, लेखक प्रा.सोपान भवरे हे परीक्षणाचे काम पाहणार आहेत. या सभेत तालुक्यातील हिंदी शिक्षक जे हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी, विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी, हिंदी विषयासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करतात अशा हिंदी शिक्षकांना कृतिशील हिंदी अध्यापक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिंदी अध्यापक मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांची माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच हिंदी मंडळाचे सचिव दिलीप पाटील व हिंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे यांना हिंदी दिनानिमित्त अनुक्रमे सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर आणि महाराज सयाजी गायकवाड कॉलेज, मालेगाव येथे व्याख्याता म्हणून निमंत्रित केल्याबद्दल त्यांचा हिंदी मंडळाच्या वतीने शशिकांत आढावे व श्रीमती कविता मनोरे यांनी पुस्तक आणि बुके देऊन सत्कार केला .

सभेस हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील, मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दिपक पवार, मार्गदर्शक सोपान भवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे व नारायण चौधरी, सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी व प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम, सदस्य श्रीमती कविता मनोरे, योगेश्री पाटील, प्रतिभा जाधव, प्रशांत वंजारी, मंगला चव्हाण, जितेंद्र बाविस्कर यांची उपस्थिती होती. सभा यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव चे शिक्षक शशिकांत आढावे आणि श्रीमती कविता मनोरे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सचिव दिलीप पाटील यांनी आभार व्यक्त केले. तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या सत्रातच घेण्याचे नियोजन करु, यासाठी हिंदी अध्यापक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देऊन मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी सभेचे विषय व कामकाज पूर्ण झाल्याचे घोषित केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!