जळगाव येथे समता शिक्षक परिषदेची सभा संपन्न

बदलत्या जगात शिक्षकच नव्हे तर अध्यापन पद्धती बदलली पाहीजे : भरत शिरसाठ

अमळनेर : बदलत्या जगात शिक्षकच नव्हे तर अध्यापन पद्धती बदलली पाहीजे व एकविसाव्या शतकाची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात केली पाहिजे असे मत समता शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी व्यक्त केले. समता शिक्षक परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या संयुक्तरित्या आयोजित नुकत्याच झालेल्या सभेत माध्यमिक पतपेढी, जळगांव येथे मार्गदर्शन करतांना म्हणाले. सभेस प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष सुर्यकांत गरुड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर माध्यमिक संघटनेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे राज्य पदाधिकारी धनराज मोतीराय, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप, महिला विभाग जिल्हाध्यक्षा छाया सोनवणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरुड यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर प्रसंगी २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतीराव फुले स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यातून २० प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गुणवंत शिक्षक सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महीन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे व शिक्षणक्षेत्रात वाढत चाललेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. चालू वर्षापासून संघटनेमार्फत विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकविसाव्या शतकात बदलत्या काळात शिक्षकासह अध्यापन पध्दतीत बदल व्हावा याकरीता संघटनेमार्फत नवीन अध्यापन पद्धती व तंत्रांच्या माहीतीसाठी कार्यशाळा घेतली जाणार आहे. शिक्षकांचे वेतन हे एस.बी.आय.शी संलग्न करण्याकरिता प्रयत्न करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यावेळी जळगांव जिल्हा समता शिक्षक परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवी प्राथमिक कार्यकारिणी अशी.. जिल्हाध्यक्षा : श्रीमती प्रभावती बावस्कर- आर.आर.विद्यालय, जळगांव, उपाध्यक्ष : गोविंदा वंजारी- एरंडोल, कार्याध्यक्ष : रमेश सोनवणे- जळगांव, सचिव : अजय भामरे- अमळनेर, कोषाध्यक्ष : प्रविण अहिरे- चाळीसगाव, सहसचिव : संगिता भैय्यासाहेब सोनवणे- पिंपरखेड, संघटक : सुरेश सोनवणे-चाळीसगाव

माध्यमिक कार्यकारीणीचाही विस्तार करण्यात आला. त्यात गणेश दत्तात्रय बच्छाव(म्हसावद) यांची जिल्हा सचिव पदी तर श्रीमती आश्विनी कोळी- यावल, श्रीमती शितल जडे- पाचोरा यांची महीला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे राज्य पदाधिकारी धनराज मोतीराय, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद आठवले यांनीही मनोगत व्यक्त केले. समता शिक्षक परिषद हे निस्वार्थी शिक्षकांचेे सघटन असून बहुजन महापुरुषांच्या विचारसरणीप्रमाणे  शिक्षिकांना व्यावसायिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करत असल्याचे आपल्या अध्यक्षिय भाषणात संघटनेचे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सुर्यकांत गरुड यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बी. एन.पाटील यांनी तर सूत्रसंचालन माध्यमिक विभागाचे सरचिटणीस रणजीत सोनवणे यांनी केले. वाय.टी.पाटील यांनी आभाार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव महानगर प्रमुख टी.बी.पांढरे, जिल्हा समन्वयक राहुल पाटील, चिंतामण जाधव, प्रकाश तामस्वरे, हेमकांत लोहार, सुधाकर मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!