छत्रपती शिवाजी नाट्यगृह पासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा असेल. मोठ्या प्रमाणावर उपस्थितीचे आवाहन
अमळनेर : तालुक्यात झालेल्या ओल्या दुष्काळामुळे शेेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र शासनास त्याचे अद्याप गांभीर्य ओळखू येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ता.५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केेेेले आहे. या मोर्चा बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना नुकतेच निवेदन सादर केले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
पीकविमा व पंचनाम्याबाबत शेतकऱ्यांनी केलेली मागणी… १) शासन निर्णयानुसार विमा योजना ही क्षेत्र हा घटक धरून राबविण्याबाबत स्पष्ट आदेश असताना त्यास धरून मंडळ निहाय नुकसानाबाबत पंचनामे करण्यात आले पाहिजे. २) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पिकांच्या किंवा शेतीच्या सद्यस्थितीबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करावेत. उदा. रिमोट सेंसिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन इ. ३) काढणी पश्चात जे नुकसान झाले आहे त्याचे निरपेक्ष पद्धतीने पंचनामे करावेत. जन्मदिनाच्या४) प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहून शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकू अश्या पद्धतीने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात बळीराजा अटकला असताना राजकीय नेत्यांना सत्तेशिवाय काही सुचत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी तरी शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकू अश्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा ह्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो. शेतकरी बांधवांंनी मोर्चास मोठ्या प्रमाणावर उपस्थितीचे आवाहन आयोजकांंनी केले आहे.