खवशी वि.का.सेवा सोसायटीच्या रिक्त संचालिका पदी सौ.मिनाबाई आनंदापूरी गोसावी बिनविरोध


अमळनेर : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने तालुक्यातील खवशी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ‘महिला राखीव’ प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर अध्यासी अधिकारी एस.पी.महाजन यांचे अध्यक्षतेखाली आज दि.१० आॅक्टोबर २०२२ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ ते १२ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. दरम्यानच्या काळात, या रिक्त जागी सौ.मिनाबाई आनंदापूरी गोसावी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सन २०२१ ते २०२६ या काळासाठी दि.२४ एप्रिल २०२२ रोजी खवशी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया होऊन त्याचदिवशी मतमोजणीचा कार्यक्रम पार पडला. दरम्यानच्या काळात, ‘महिला राखीव’ मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या संचालिका यमुनाबाई उत्तम पाटील यांचा दुर्देवाने दीड महिन्यानंतर शनिवार, दि.१८ जून २०२२ रोजी मृत्यू झाल्यामुळे सोसायटीचे संचालक पद रिक्त झाले होते. या रिक्त जागी सौ.मिनाबाई आनंदापूरी गोसावी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्यामकांत देशमुख, व्हा.चेअरमन मुकेश पाटील, संचालक सर्वश्री गजानन पाटील, कैलास पाटील, भागवत सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, विश्वास पाटील, सुर्यकांत कापडे, चंद्रदीप पाटील, महेंद्र गोसावी, सौ.उषाबाई कापडे, सुमनबाई पवार हजर होते. निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव भरत पाटील यांनी सहकार्य केले. दिव्यचक्र परिवारातर्फे नवनियुक्त संचालिका यांचे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!