
अमळनेर : भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भुसावळ भूषण प्रा.डॉ.म.सी.हळपे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व मित्रपरिवार अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. या समारंभाला श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळ, भुसावळचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्राध्यापक व.पु.होले व अमळनेर येथील साप्ताहिक दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रा.डॉ.म.सी.हळपे यांचे जीवनावर प्रकाशझोत टाकणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता भुसावळ येथील सहकार नगर मधील कलश पॅलेस च्या तळ मजल्यावर आयएमए हॉल शेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष अडावदकर, ज्योती कुलकर्णी, ललित नेमाडे, पोपटराव पाटील, बापू वारके आदींनी केले आहे.
