हिंदी अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

अमळनेर : येथील अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ, शिक्षण विभाग पंचायत समिती, अमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया, शहादा यांच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हिंदी दिवसानिमित्त तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तालुक्यातून ४५ माध्यमिक शाळेच्या २६०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्याचबरोबर जवळपास ५३ हिंदी शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. तो पुढीलप्रमाणे…

ग्रामीण भाग – मोठा गट : प्रथम – प्रतीक्षा अरुण पाटील (आबासाहेब एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे ), द्वितीय – पियुष ज्ञानेश्वर महाजन ( शारदा माध्य. उच्च माध्य. विद्यालय, कळमसरे ), तृतीय – कल्याणी तुकाराम बाविस्कर (आदर्श माध्य. उच्च माध्य. विद्यालय, जळोद – अमळगाव), उत्तेजनार्थ (१) – वंशिका प्रदीप बाविस्कर (बालाजी विद्यालय, गांधली- पिळोदे), उत्तेजनार्थ (२) – नंदिनी दिलीप पाटील (एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर ), उत्तेजनार्थ (३) – तेजल किरण कोळी (के.पी.सोनार हायस्कूल, जैतपीर)

ग्रामीण भाग – छोटा गट : प्रथम – खुशी हेमलाल कुंभार (दत्त माध्यमिक विद्यालय, पातोंडा), द्वितीय – प्रदीप मुकेश शेवाळे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, पाडसे), तृतीय – गौरव प्रकाश कोळी (आदर्श माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, अमळगाव), उत्तेजनार्थ (१) – तुषार रायसिंग राणे (माध्यमिक विद्यालय, रणाईचे ), उत्तेजनार्थ (२) – जान्हवी अमोल पाटील (पं.नेहरू माध्य. विद्यालय, फाफोरे), उत्तेजनार्थ (३) – कुणाल जगदीश पाटील (उदय माध्यमिक विद्यालय, झाडी)

शहरी विभाग मोठा गट : प्रथम – निखिल प्रवीण ठाकरे (साने गुरुजी नूतन माध्य. विद्यालय, अमळनेर), द्वितीय – सारंग तुषार देवरे (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर), तृतीय – भक्ती योगेश खैरनार (साने गुरुजी कन्या हायस्कूल,अमळनेर), उत्तेजनार्थ (१) – आनंदी परेश पुरभे ( न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, अमळनेर), उत्तेजनार्थ (२) – निलेश ज्ञानेश्वर मोरे (विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर), उत्तेजनार्थ (३) – प्रणव मुरलीधर भोई (लोकमान्य विद्यालय, अमळनेर)

शहरी विभाग छोटा गट : प्रथम – कौशल जगदीश पाटील (ऍड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर), द्वितीय – समीक्षा अभय बिऱ्हाडे, तृतीय – शिवम त्रिपाठी (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अंमळनेर), उत्तेजनार्थ (१) – सारंग विजयसिंह पाटील (पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर), उत्तेजनार्थ (२) – प्रतीक्षा जयवीर पाटील (सावित्रीबाई कन्या माध्य.विद्यालय, अमळनेर), उत्तेजनार्थ (३) – अक्सा कय्युम खाटीक (अल-फैज गर्ल्स उर्दू स्कूल, अमळनेर)

ग्रामीण विभागाच्या निबंधांचे परीक्षण प्रताप महाविद्यालय, अमळनेर हिंदी विभागाच्या प्रा.डॉ. कल्पना पाटील यांनी तर शहरी विभागाच्या निबंध परीक्षणाचे काम प्रा.सोपान भवरे यांनी पाहिले.
यासोबतच हिंदी निबंध स्पर्धा व इतर हिंदी विषयाच्या स्पर्धांचे आपल्या शाळेत आयोजन करणाऱ्या ५३ हिंदी शिक्षकांना कृतिशील हिंदी अध्यापक’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या हिंदी निबंध स्पर्धेसाठी ४३ शाळेच्या हिंदी शिक्षकांनी आपआपल्या शाळेतून २ उत्कृष्ट निबंध मंडळाकडे परीक्षणासाठी पाठविले होते. त्या तालुकाभरातल्या १४२ विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन पर पारितोषिक देण्याचा निर्णय हिंदी अध्यापक मंडळाने घेतला आहे. या तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा शहादा चे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शर्मिला चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. या तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण शाळेच्या द्वितीय सत्राच्या सुरुवातीला करण्यात येणार असून स्पर्धेतील उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी सांगितले. निबंध स्पर्धा यशस्वीतेसाठी मार्गदर्शक दिपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे, नारायण चौधरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर
संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम, श्रीमती कविता मनोरे, श्रीमती योगेश्री पाटील, प्रशांत वंजारी, जितेंद्र बाविस्कर यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!