अमळनेर : येथील खा.शि.मंडळाच्या विश्वस्त सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांना स्व.चंद्रभागाबाई कंखरे बहुउद्देशीय संस्था शिरपूर व महाले प्रतिष्ठान, धुळे यांच्या विद्यमाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२२” शिरपूर येथील एस.एम.पटेल हाॅल, आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज, करवंद नाका शिरपूर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, उद्यान पंडित बापूसाहेब ग.द.माळी गुरुजी, शिक्षण संस्था शिरपूर येथील मोहन सोनवणे, कैलास कंखरे, मनोज धनगर, रामचंद्र ठाकरे, मा.नगरसेवक रोहित रंधे, दशरथ धनगर, धुळे ग.स.चे संचालक शशांक रंधे उपस्थित होते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील विविध जाती धर्माच्या ३८ शिक्षिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ. वसुंधरा लांडगे या अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका तसेच साने गुरुजी विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
याशिवाय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जळगांव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना व धनराज फाऊंडेशन यांच्या वतीने मंगळग्रह मंदिर अमळनेर येथे वसुंधरा लांडगे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी धनराज विसपुते, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जोशी, जळगांव ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय बापू पाटील, संचालक अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष भिरुड दादा, संभाजी पाटील, ॲड.ललिताताई पाटील, आर.डी.पाटील, योगेश भोईटे आदी उपस्थित होते. सौ. वसुंधरा लांडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !