मारवड येथे मंगळवारी झाला करियर संवाद वारीचा समारोप; उपक्रमाला मिळाला प्रचंड प्रतिसाद

अमळनेर : तालुक्यात शनिवार (ता.२२) पासून सुरू असलेल्या “करियर संवाद वारी- थेट आपल्या दारी” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या करियर संवाद वारीचा समारोप मंगळवार (ता.२५) रोजी मारवड (ता.अमळनेर) येथे करण्यात आला. उत्कर्ष खान्देश अधिकारी मंडळ व विविध विकास मंचतर्फे आयोजित या उपक्रमात प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन मिळाले. ऐन दिवाळीत तालुक्यातील तरुणांना मार्गदर्शनाची मेजवानी ठरली आहे. या उपक्रमामुळे निश्चितच तालुक्यासह खानदेशात प्रशासनात अधिकाऱ्यांचा सह नोकरदारांचा टक्का वाढणार आहे.

मारवड येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जवखेडे येथील सुपुत्र व सध्या आयएसएस नरेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना वडिलांचे छत्र हरपल्यानंतर लहान भावाने घराचा भार उचलत यशात मोलाचा वाटा उचलला व या प्रवासात मित्रपरिवाराने कसे सहकार्य केले ? याची संघर्षकहाणी कथन केली. नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार यांनी सांगितले की, मारवड हे गाव अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. आयआरएस संदिपकुमार साळुंखे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व त्यांच्या प्रेरणेने बहुसंख्य युवक अधिकारी पदावर कार्यरत आहेत. कोरोनानंतर दोन- तीन वर्षात आलेली मरगळ झटकून आगामी काळात विविध स्पर्धा परिक्षेत खान्देशी अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा या उद्देशाने करीयर संवाद वारीचे आयोजन केले असल्याचे सांगितले. स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षांमध्ये सुमारे २३ हजार पेक्षा जास्त पदे असतात. प्रत्येकाने संकुचित वलयातून बाहेर पडले पाहिजे. बिकट परिस्थितीतच माणसाला यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचवते. पोलीस भरती व वर्ग ३ ची भरती या परीक्षा आता एमपीएससी मार्फत होणार आहेत. उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी मारवड हे तालुक्यातील स्पर्धा परीक्षार्थी व अधिकाऱ्यांसाठी पंढरी असून याच ठिकाणी वारीचा समारोप करण्याची यामागची संकल्पना कपिल पवार यांची असल्याचे सांगत कौतुक केले. युनियन बँकेचे मॅनेजर मयूर पाटील यांनी बँकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शन करताना बँकिंग हे करीयर करण्यासाठी योग्य क्षेत्र असून त्या क्षेत्रातील सोयी, सुविधा व संधी समजावून सांगितल्या. शिक्षक भैय्या पाटील यांनी टीईटी परीक्षा, फॉरेन्सिक इन्स्पेक्टर राहुल पाटील व डॉ चेतन सनेर यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. आयएसएस नरेश पाटील यांच्या सह त्याला मोलाची साथ देणाऱ्या कनिष्ठ बंधू सुनील पाटील यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.ए.धनगर व एल.जे.चौधरी यांनी तर आभार व्ही.ए.पवार व उपअभियंता विजय भदाने यांनी व्यक्त केले. यावेळी मारवड व परिसर विकास मंचतर्फे स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेण्यासाठी रोख स्वरूपात मदत मान्यवरांच्या हाती सुपूर्द करण्यात आली.

यांनी केले मार्गदर्शन…

नागपूरचे आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये नागपूर महानगर विकास प्राधिकरण मंडळाचे उपसंचालक कपिल पवार, जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार, आयएसएस तथा सहाय्यक संचालक नरेश पाटील, पीडब्लूडी उपअभियंता विजय भदाने, युनियन बँक सिनियर मॅनेजर मयूर पाटील, नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील, ए.पी.आय. जितेंद्र पाटील, एपीआय गोपीचंद नेरकर, आरटीओ स्वप्नील वानखेडे, एसटीआय संदीप पाटील, सरकारी लेखापरीक्षक प्रशांत पाटील, फॉरन्सिक इन्स्पेक्टर राहुल पाटील, केंद्रीय सुरक्षा बल शरद खैरनार, जळगाव पोलीस चंदन पाटील, स्पर्धा मार्गदर्शक प्रा.डॉ. एस.ओ.माळी, स्पर्धा मार्गदर्शक डी.ए.धनगर, स्पर्धा मार्गदर्शक व्ही.ए.पवार, स्पर्धा मार्गदर्शक उमेश काटे, स्पर्धा मार्गदर्शक भैय्या पाटील, दिवाकर पाटील यांनी गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गोंदिया च्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

यांचे मिळाले सहकार्य…

तालुक्यातील विविध विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांसह जवखेडा येथे ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील, डॉ दिनेश पाटील, सुरेश पाटील यांच्यासह सरपंच, उपसरपंच , कन्हेरे येथे एपीआय गोपीचंद पाटील, मुख्याध्यापक आर.बी.पाटील, हेमंत भोसले, प्राथमिक शिक्षक विनोद पाटील, मंगरूळ येथे प्रा.संदीप पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, समाधान पारधी, मनोहर नेरकर, चंद्रकांत पाटील, प्रेमराज पवार, पातोंडा येथे प्रा.भूषण बिरारी सह पातोंडा विकास मंचचे पदाधिकारी, खेडी प्र.ज- प्रा.श्याम पवार, प्रा.कैलास पाटील, भरवस येथे किशोर पाटील, संजय पाटील, विजय पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मिलिंद पाटील, सबगव्हानचे नरेंद्र पाटील, आर.बी.पाटील, सानेनगर (अमळनेर) येथे प्राथमिक शिक्षक प्रवीण पाटील, संस्थाचालक महेश पाटील, सुभेदार श्रीराम पाटील, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, माध्यमिक शिक्षक निरंजन पेंढारे, करणखेडे येथे भैय्यासाहेब पाटील, एसटीआय संदीप पाटील, लेखा परीक्षक प्रशांत पाटील, मारवड येथे गोकुळ साळुंखे, एल.जे.चौधरी, राजेंद्र सूर्यवंशी, महेश साळुंखे, राकेश गुरव, गणेश पाटील, प्रदीप चौधरी, हर्षल साळुंखे, वैभव साळुंखे यांच्यासह मारवड विकास मंचचे पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!